Share

IPL 2022 CSK vs RCB : एक मॅच विक्रमांची..! धोनीला आज एक-दोन नव्हे, तर ‘इतके’ विक्रम करण्याची सुवर्णसंधी; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs RCB) यांच्यात सामना रंगणार आहे. महेंद्रसिंह धोनी चेन्नईचा पुन्हा कर्णधार झाल्यानंतर संघ पुन्हा विजयाच्या मार्गावर आहे. १ मे रोजी पुण्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने सनरायझर्स हैदराबादचा १३ धावांनी पराभव केला. आज याच मैदानावर धोनीचा संघ बंगळुरूविरुद्ध खेळणार आहे. अंतिम चारमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी चेन्नईला हा सामना जिंकावा लागेल. हा सामना धोनीसाठी खास आहे. या सामन्यात तो एका मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

धोनी आज चेन्नई सुपर किंग्जकडून २००वा आयपीएल सामना खेळणार आहे. फ्रेंचायझीसाठी २०० किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा तो फक्त दुसरा खेळाडू असेल. त्याच्या आधी विराट कोहलीने एका संघासाठी २०० किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत. विराटने आरसीबीसाठी आतापर्यंत २१७ सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये एका संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.

धोनी आज टी-२० कर्णधार म्हणून ३०२ वा सामना खेळणार आहे. कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत ५९९४ टी-२० धावा केल्या आहेत. जर त्याने आज आणखी ६ धावा केल्या तर धोनी कर्णधार म्हणून ६००० धावा पूर्ण करेल. हा विक्रम करणारा तो दुसरा कर्णधार ठरणार आहे. विराट कोहलीने १९० टी-२० सामन्यांमध्ये कर्णधार असताना ६४५१ धावा केल्या आहेत. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ५ शतके आणि ४८ अर्धशतके केली आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा धोनीचा आवडता विरोधी संघ आहे. त्याने आरसीबीविरुद्ध आतापर्यंत ८३६ धावा केल्या आहेत. याशिवाय धोनीने बेंगळुरूविरुद्ध ४६ षटकार मारले आहेत. धोनीने आजच्या सामन्यात बंगळुरूविरुद्ध ४ षटकार मारले तर तो आयपीएलमध्ये कोणत्याही संघाविरुद्ध ५० षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!