🕒 1 min read
पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) चा ४६वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs CSK) यांच्यात होत आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व सांभाळत आहे. रवींद्र जडेजाने या सामन्यापूर्वी सीएसकेचे कर्णधारपद धोनीकडे सोपवले होते.
संघाची धुरा सांभाळताच धोनीने दोन खेळाडूंना संधी दिली आहे. डेव्हॉन कॉनवे आणि सिमरजीत सिंग हे खेळाडू चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत. आयपीएलच्या १५व्या मोसमात सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत ८ सामन्यांत ५ विजय नोंदवले असून ते चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जने ८ पैकी फक्त २ सामने जिंकले असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत.
#SRH have won the toss and they will bowl first against #CSK
Follow the game here – https://t.co/aLPrrVwUUh #TATAIPL #SRHvCSK pic.twitter.com/nyZsoV3jvK
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी. नटराजन.
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक/कप्तान), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, महीश थिक्षना
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
