कोरोना महामारीतून देश सावरत असतानाच आता पुन्हा राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध घातले जाणार का हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. राज्यात मोठ्या संख्येने लसीकरण झाल्यामुळे सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे आणि त्याचमुळे मास्क घालणं ही ऐच्छिक ठेवण्यात आलेल आहे.
परंतु जर रुग्णसंख्या वाढली तर मात्र मास्क सक्ती करावी लागेल असं मोठं विधान त्यांनी यावेळी केलं आहे. तसेच त्यांनी जनतेला कोरोना संबंधीची सर्व काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
