Share

“…हा महाराष्ट्राचाच अपमान”, पंतप्रधान मोदींवर संजय राऊत यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतरत्न ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार २४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये झालेल्या ८० व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळ्यात या पुरस्काराने पंतप्रधान मोदींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची उपस्थिती होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव आमंत्रण पत्रिकेवर नसल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा रंगली. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून भाष्य केले आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘२४ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान मोदी लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईला आले. पंतप्रधान मुंबईत, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नावच त्या निमंत्रण पत्रिकेवर नाही. हा महाराष्ट्राचाच अपमान. लता मंगेशकर महाराष्ट्राच्या, त्यांना जाऊन चार महिने झाले नाहीत. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या नावाने पुरस्कार दिला तो मोदींना पंतप्रधान म्हणून. त्यांचेही कर्तव्य होते ”महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निमंत्रितांत नाहीत काय?” असे आयोजकांना विचारण्याचे. पण तसे घडले नाही. कारण महाराष्ट्राशिवाय देशाचे राजकारण सुरू झाले आहे आणि मराठी नेते काँग्रेस काळात नव्हते त्यापेक्षा जास्त दिल्लीचे गुलाम झाले आहेत.आजच्या महाराष्ट्र दिनी या स्थितीची खंत कोणाला वाटेल काय?’, असा सवालही राऊतांनी केला आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘शरद पवार हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते. महाराष्ट्र घडविण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र घडविण्याबाबतचे योगदान वेगळ्या पद्धतीचे आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते एक व्यंगचित्रकार म्हणून फटकारे मारीत होते. पुढे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कांसाठी ते प्रत्यक्ष रणात उतरले. नंतर त्यांनी केलेली शिवसेनेची स्थापना व त्यातून उभा राहिलेला स्वाभिमानी महाराष्ट्र हे आदर्श कार्य आहे.’

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!