Share

IPL 2022 RR vs MI : राजस्थानचं मुंबई इंडियन्सला १५९ धावांचं आव्हान; बटलरचं अर्धशतक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI) यांच्यात आज डबल हेडरचा दुसरा सामना रंगत आहे. डी वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कप्तान आणि ‘बर्थडे बॉय’ रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलरच्या संयमी अर्धशतकमुळे राजस्थानला २० षटकात ६ बाद १५८ धावा करता आल्या. शेवटच्या दोन षटकात राजस्थान संघाला मोठी फटकेबाजी करता आली नाही.

राजस्थानचा डाव

जोस बटलरसोबत उतरलेला सलामीवीर देवदत्त पडिक्कलला राजस्थान रॉयल्सला चांगली सुरुवात करून देता आली नाही. मुंबईचा फिरकीपटू ऋतिक शोकीनने पडिक्कलला (१५) बाद केले. राजस्थानचा कप्तान संजू सॅमसन (१६) आणि डॅरिल मिशेल (१७) यांनाही मोठी खेळी करता आली नाही. १६व्या षटकात बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले. या षटकात त्याने हृतिकला चार षटकार ठोकले, पण तो शेवटच्या चेंडूवर बाद झाला. बटलरने ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावा केल्या. बटलरनंतर शेवटच्या षटकांत राजस्थानला फटकेबाजी करता आली नाही. अश्विनने ३ चौकार आणि एका षटकारासह २१ धावांचे योगदान दिल्यामुळे त्यांना दीडशतक ओलांडता आले. २० षटकात राजस्थानने ६ बाद १५८ धावा केल्या. मुंबईकडून हृतिक, रिले मेरेडिथ आणि डॅनियल सॅम्स यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सैमसन (यष्टीरक्षक/कप्तान), डॅरिल मिशेल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन.

मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कप्तान), टिम डेविड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, ऋतिक शोकीन, डेनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!