🕒 1 min read
मुंबई : पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सलग आठ पराभवानंतर पहिला विजय मिळाला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (RR vs MI) सामन्यात मुंबईने ५ गडी राखून विजय नोंदवला. कप्तान आणि ‘बर्थडे बॉय’ रोहित शर्माला या विजयाच्या रुपात खास गिफ्ट मिळाले. या सामन्यात रोहितने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलरच्या संयमी अर्धशतकमुळे राजस्थानला २० षटकात ६ बाद १५८ धावा करता आल्या. शेवटच्या दोन षटकात राजस्थान संघाला मोठी फटकेबाजी करता आली नाही. प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने १९.२ षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुंबईचा डाव
इशान किशन आणि रोहित शर्मा हे पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून देण्यास असमर्थ ठरले. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने रोहितला (२) बाद करत मुंबईला लवकर धक्का दिला. त्यानंतर ट्रेंट बोल्टने इशान किशनला (२६) यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. सूर्यकुमारने ५ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या. तर तिलक वर्माने ३५ धावा केल्या. युझवेंद्र चहलने १५व्या षटकात सूर्यकुमारला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात प्रसिध कृष्णाने तिलकला माघारी धाडले. डॅनियल सॅम्सने २०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.
देर आए दुरुस्त आए 2⃣ points ????#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #RRvMI pic.twitter.com/IFqQOKmXiN
— Mumbai Indians (@mipaltan) April 30, 2022
राजस्थानचा डाव
जोस बटलरसोबत उतरलेला सलामीवीर देवदत्त पडिक्कलला राजस्थान रॉयल्सला चांगली सुरुवात करून देता आली नाही. मुंबईचा फिरकीपटू ऋतिक शोकीनने पडिक्कलला (१५) बाद केले. राजस्थानचा कप्तान संजू सॅमसन (१६) आणि डॅरिल मिशेल (१७) यांनाही मोठी खेळी करता आली नाही. १६व्या षटकात बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले. या षटकात त्याने हृतिकला चार षटकार ठोकले, पण तो शेवटच्या चेंडूवर बाद झाला. बटलरने ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावा केल्या. बटलरनंतर शेवटच्या षटकांत राजस्थानला फटकेबाजी करता आली नाही. अश्विनने ३ चौकार आणि एका षटकारासह २१ धावांचे योगदान दिल्यामुळे त्यांना दीडशतक ओलांडता आले. २० षटकात राजस्थानने ६ बाद १५८ धावा केल्या. मुंबईकडून हृतिक, रिले मेरेडिथ आणि डॅनियल सॅम्स यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सैमसन (यष्टीरक्षक/कप्तान), डॅरिल मिशेल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन.
मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कप्तान), टिम डेविड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, ऋतिक शोकीन, डेनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
