🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने लीगच्या मध्यातच मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने चेन्नईचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने महेंद्रसिंह धोनीला पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे.
धोनीने चेन्नईचे नेतृत्व करणे आणि जडेजाला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी दिली आहे. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली मागील २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये चेन्नईला चार आयपीएलची विजेतेपदे मिळवून दिली आहेत. यंदाच्या हंगामापूर्वी, धोनीने जडेजाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती.
Jadeja to handover CSK captaincy back to MS Dhoni:Ravindra Jadeja has decided to relinquish captaincy to focus and concentrate more on his game & has requested MS Dhoni to lead CSK. MS Dhoni has accepted to lead CSK in the larger interest & to allow Jadeja to focus on his game.
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 30, 2022
या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. चेन्नई संघाला ८ सामन्यांत ६ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. गतवर्षी विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईच्या संघाकडून यावेळीही चांगली कामगिरी होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. आता पुन्हा एकदा धोनीच्या हातात संघाची सूत्रे आल्याने कामगिरीवर परिणाम दिसून येईल का याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
चेन्नई सुपर किंग्जला पुढील सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचे आहे. डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात उद्या रविवारी चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यावेळी चाहत्यांना त्यांचा आवडता कर्णधार धोनी टॉसवर पाहायला मिळणार आहे. या वेळी संघासाठी नवा कर्णधार तयार करण्याच्या उद्देशाने जडेजाकडे जबाबदारी देण्यात आली. मात्र, हे काम करण्यात जडेजाला यश आले नाही. येत्या सामन्यांमध्ये चेन्नई संघाची कामगिरी कशी असेल हे पाहणे रंजक ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
