मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या स्वत: खासदारांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. ही बैठक मातोश्रीवर घेण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांना बोलावले आहे. ही बैठक राज्यात सुरु असलेल्या सर्व घडामोडीं संदर्भात होणार आहे, अशी माहिती आहे.
सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा वाद राज्यात पाहायला मिळत आहे. या सगळ्यात आता मनसेनेही उडी घेत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या स्वत: खासदारांशी चर्चा करणार आहेत. उद्या २९ एप्रिल रोजी सर्व खासदारांची महत्वाची बैठक होणार आहे, यामध्ये राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
“लवकरात लवकर सभा घेऊन सर्व विरोधकांना उत्तर देणार आहे. मास्क काढून सभा घेणार आहे. त्या सभेत सगळ्यांचा एकदाचा काय तो परामर्श आणि सोक्ष मोक्ष लावून टाकायचाय, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच येत्या १ मे रोजी उद्धव ठाकरेंची पुण्यात सभा आहे. ही बैठक म्हणजे त्या सभेची पूर्वतयारी असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या –


