Share

पुण्यात एसटी बसची धडक, तिघे गंभीर जखमी!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : एसटी बस’चा अचानक ब्रेक फेल झाल्याने बसने पाच ते सहा वाहनांना धडक दिली आहे. हा अपघात पुण्यातील सातारा रोडवर घडून आला. या अपघातात तिघे जन गंभीर तर चार ते पाच जन किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पुण्यातील सातारा रोडवरील, हॉटेल रविकांत जवळील सद्गुरू श्री शंकर महाराज उड्डाणपुलावर घडून आला.

या अपघातासंबंधी अधिक माहिती अशी की, एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने, बसने समोरील चार चाकीसह पाच ते सात वाहनांना धडक दिली. या अपघातात तिघे जन गंभीर जखमी तर चार ते पाच जन किरकोळ जखमी झाले आहेत. या जखमी व्यक्तींना नजीकच्या कात्रज येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या अपघातामुळे सातारा रोड वर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सातारा रोडवर वाहनाच्या लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या घटनास्थळी वाहतूक पोलीस तसेच भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले.

स्वारगेट ही बस सातारा येथून सकाळी पुण्याच्या दिशेने निघाली होती. बालाजीनगर परिसरात गर्दी कायम असते. त्यामुळे उड्डाणपुलावरून वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. बस पुलाच्या काठडयाला धडकल्याने, बस पुलावरून खली कोसळले नाही. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त एसटी बस बाजूला करण्यात यश मिळवले.

गेल्या सहा महिन्यांपासून एसटी आंदोलन सुरू होते. या कालावधीत एसटी बसेसची देखभाल झाली नसण्याची शक्यता आहे. देखभाल झाली नाही म्हणून आजचा हा अपघात घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!