Share

IPL 2022 : दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी उमरान मलिकविषयी केली ‘मोठी’ मागणी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याने आपली भेदक गोलंदाजी सुरुच ठेवली आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात उमरानने २५ धावांत पाच बळी घेतले. दिग्गज माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी उमरान मलिकला आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे.

गावसकर सामन्याच्या समालोचनानंतर म्हणाले, “मला वाटते, त्याच्यासाठी पुढील आव्हान भारतीय संघ आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही कारण भारताकडे मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आहेत. मोहम्मद सिराज आणि उमेश यादव आहेत. त्यामुळे कदाचित तो खेळू शकणार नाही. पण फक्त संघासोबत प्रवास करणे, रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या खेळाडूंसोबत प्रवास करणे, त्यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे याचा काय परिणाम होतो ते पाहूया.”

उमरानने संपूर्ण हंगामात नियमितपणे १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे आणि आठ सामन्यांमध्ये १५.९३च्या सरासरीने १५ बळी घेतले आहेत. भारताचा इंग्लंड दौरा जूनमध्ये सुरू होणार आहे. कोविड-१९ मुळे गेल्या वर्षी रद्द झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी दोन्ही संघ प्रथम खेळणार आहेत. यानंतर तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. भारतीय संघ २६ जूनपासून डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून ब्रिटन दौऱ्याला सुरुवात करेल.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!