🕒 1 min read
मुंबई: राज्यात भोंग्यावरुन राजकारण तापले असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार आत्तापर्यंत जवळपास ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात सलोखा राहावा यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मनसे सोडून सर्व पक्षांनी एकच भूमिका घेतलेली आहे. भाजपने तर बैठकीवर बहिष्कार टाकला होता. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरबाबत आधीच नियमावली दिली आहे. उद्या एखादा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांसाठी एकच कायदा करावा लागेल. उत्तर प्रदेशमध्ये तिथले मुख्यमंत्री योगी यांनी काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
राज्यात सलोखा राहावा यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मनसे सोडून सर्व पक्षांनी एकच भूमिका घेतलेली आहे. भाजपने तर बैठकीवर बहिष्कार टाकला होता. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरबाबत आधीच नियमावली दिली आहे. @AjitPawarSpeaks #loudspeakers pic.twitter.com/OpTs8eZZH4
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 28, 2022
इतकी वर्ष सर्व चालत आले आहे. आतापर्यंत भाजपला कुणी थांबवले होते? आजच ही मागणी का केली जात आहे? उद्या सुप्रीम कोर्टाने काही आदेश काढला तर सर्व धर्माच्या भाविकांना तो निर्णय लागू होईल, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहीजे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जातीय दरी निर्माण करुन आज जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरु आहे. नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही. यातून काही जखमा झाल्या तर नको ते प्रश्न निर्माण होतील. असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : आधीच ८ पराभव आणि त्यात…! मुंबई इंडियन्सला बसला अजून एक धक्का; वाचा घडलंय काय?
- “मोदींच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना टोमणे मारण्याचंच काम जास्त झालं”- संजय राऊत
- “२५ वर्षाच्या कारकिर्दीत मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने…”, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
- “पुण्यात तलवारींचा साठा सापडला, गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा का ?” ; शेलारांचा सवाल
- चोरट्यांनी थेट खासदारांच्या बंगल्यात केली घरफोडी; पोलिस यंत्रणाही हादरली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
