Share

“…कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”, ‘त्या’ निर्णयावरून अमृता फडणवीसांचा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात भोंग्यावरुन राजकारण तापले असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार उत्तर प्रदेशात आत्तापर्यंत जवळपास ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असतात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadanvis) यांनी अगदी थोडक्यात ट्वीट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

“ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”, असे ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. यातून त्यांनी अप्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. दरम्यान यासंदर्भातच राज ठाकरे यांनीही ट्विट करत म्हटले की, “उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’. तसेच महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यावेळी प्रत्येक धर्माला त्यांच्या पद्धतीनं प्रार्थना करण्याचा अधिकार असून त्यासाठी माईक, स्पीकर यांचा वापरही करण्यास हरकत नाही. मात्र कुणाचाही अडथळा करुन जी गोष्टी केली जाते, त्याला प्रार्थना म्हणता येऊ शकत नाही, असे योगी म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!