Share

“२५ वर्षाच्या कारकिर्दीत मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने…”, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजपकडून सध्या ‘पोलखोल अभियान’ सुरु आहे. भाजप नेते अनेक ठिकाणी सभा घेत ठाकरे सरकार विरोधात पोलखोल अभियान राबवत आहेत. त्या निमित्तानेच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज कांदिवलीतील पांडे कंपाउंड व जानु पाडा येथे सभा घेत शिवसेनेवर निशाणा साधला.

“गेल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. नाले सफाई, रस्ते दुरुस्ती, खड्डे या जनसामान्यांशी संबंधित विषयांमध्ये सत्तेचे लोणी खाण्यासाठी कंत्राटदारांची तळी उचलली व प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मुंबईकरांचा विश्वासघात केला. मुंबई महापालिकेतील या भ्रष्टाचाराची पोलखोल कांदिवलीतील पांडे कंपाउंड व जानु पाडा येथील सभेत केली. यावेळी नागरिकांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.”, असे ट्वीट दरेकर यांनी केले आहे.

तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनीही सभा घेत ठाकरे सरकारवर टीका केली. “कोस्टल रोडमुळे वरळीतील कोळी बांधवांचा मच्छीमारीचा व्यवसाय उध्वस्त होणार आहे. याला कोळी बांधव विरोध करीत आहेत. मात्र अजून प्रश्न का सुटला नाही? सगळ्यांना पाणी देणार म्हणता मग गावठाण आणि कोळीवाड्यांबाबत का बोलला नाहीत?”, असा थेट प्रश्न आशिष शेलार यांनी  वरळी कोळीवाड्यात सभेत केला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!