🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्यांनी केली होती. या पाश्वर्भूमीवर युवा सेनेने रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी यांना अटक केली. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक नवनवीन राजकीय नाट्य पाहायला मिळत आहेत. याच साऱ्याचा समाचार शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून घेतला, याला गिरीश महाजनांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले.
सध्या भाजपाची आणि भाजपा समर्थकांकडून सुरु असणारा प्रकार पाहून दादा कोंडके असते तर त्यांनी नवा सोंगाड्या चित्रपट काढला असता, असा खोचक टोला शिवसेनेनं लागवला. या शिवाय ‘किरीट सोमय्या हे भाजपाचे नाच्या असून त्यांचे सुत्रधार फडणवीस आहेत,’ अशी टीका शिवसेनेनं केली. मात्र यानंतर या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिल आहे.
भाजप आमदार गिरीश महाजन यांनी यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. सोंगाड्या चित्रपट निघाला असता तर संजय राऊतांनाच भूमिका मिळाली असती, असा घणाघात गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
