🕒 1 min read
मुंबई: आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालीसा प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची भेट घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलिस ठाण्यात गेले असता शिवसैनिकांना त्यांच्या गाडीवर दगड भिरकावल्याने गाडीची काच फुटली. यामध्ये त्यांना दुखापतही झाली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Syed) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
शिवसैनिक संतापून रस्तावर उतरले हे माहिती असताना सोमय्या तिकडे का गेले? बाळासाहेबांची शिकवण आहे जो नडला त्याला फोडला. जर त्या कारमध्ये नरेंद्र मोदी असते तरीही ती कार शिवसैनिकांनी फोडलीच असती. असे विधान दिपाली सय्यद यांनी केले आहे. यावेळी त्यांनी राणा दामत्पत्यावरही टीका केली. न्यायालयीन कोठडीत कोणाला फाईव्ह स्टार हॉटेलची ट्रिटमेंट मिळत नाही. कोठडीत नेल्यावर तुम्ही म्हणत असाल की मला फाईव्ह स्टारची थाळी द्या, असे होणार नाही. कोठडीत सर्वांना समान वागणूक दिली जाते.
पुढे त्या म्हणाल्या की, “राज्यात थोडे काही झाले की, किरीट सोमय्या दिल्लीत जातात. जरा काही झाले की मोदींशी चर्चा करणार ,केंद्राशी चर्चा करणार म्हणतात. सोमय्यांना लोकशाही माहितच नाही का? असा सवालही यावेळी दिपाली सय्यद यांनी केला.
महत्वाच्या बातम्या:
- भाजपच्या धमन्यांत हिंदुत्वाचे रक्त नसून टोमॅटो सॉस आहे- संजय राऊत
- “चार मते कमी पडली तरी चालेल, पण माझे माझ्या राज्यावर…”, सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
- “सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या फडात तुणतूणं हाती घेतलेल्या माणसासारखी”, अमोल मिटकरींचा टोला
- …तर दादा कोंडके यांना ‘भाजपचे हवालदार’ असाही एक चित्रपट काढावा लागला असता- संजय राऊत
- “नवे सोंगाडे, दादा कोंडके हवे होते!”, ‘सामना’तून भाजपवर प्रहार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
