Share

अंजली दमानिया शिवसेनेवर संतापल्या; म्हणाल्या, “बाई या शब्दाचा…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र बघायला मिळाले. तसेच याप्रकरणी वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना अग्रलेखात भाजप या एका महिलेच्या सांगण्यावर नाच्या पोरांसारखा नाचत असल्याचा टोला लगावला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी शिवसेनेनवर टीका केली आहे.

यासंदर्भात अंजली दमानिया यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,“बाई या शब्दाचा इतका अनादर? अतिशय किळसवाणं”, असे दमानिया म्हणाल्या आहेत.

दरम्यान, “भाजपने सध्या हिंदुत्वाच्या नावाने जो धांगडधिंगा सुरू केला आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. हिंदुत्व हा एक संस्कार आणि संस्कृती आहे, धिंगाणा नाही. अमरावतीचे राणा दाम्पत्य हे अनुक्रमे खासदार व आमदार आहेत. ते कधी कोणत्या पक्षात असतील व कोणता झेंडा खांद्यावर घेतील त्याचा भरवसा नाही. श्रीरामाचे नाव घेण्यास राणाबाईंचा विरोध होता. संसदेत श्रीरामाच्या नावाने शपथ घेणाऱ्यांना या बाईने विरोध केला होता. त्याच बाई आज ‘हनुमान चालिसा’ वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात व समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो हे आश्चर्यच आहे”, असे संजय राऊत आपल्या लेखात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!