Share

IPL 2022 KKR vs GT : हार्दिक इज बॅक..! गुजरातनं जिंकला टॉस; कोलकाता संघात ‘तीन’ बदल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज शनिवारी डबल हेडर सामने होणार आहे. त्यातील दिवसाचा पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्स (KKR vs GT) यांच्यात रंगत आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या स्पर्धेतील ३५व्या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकाताने आज रिंकू सिंग, टिम साऊदी, सॅम बिलिंग्ज यांना संघात स्थान दिले आहे. मागील सामन्यात गुजरातचे नेतृत्व राशिद खानने केले होते. कोलकाताचा संघ सातपैकी चार सामने गमावून गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्सचा संघ सहापैकी पाच सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

हंगामाच्या सुरुवातीला केकेआरने त्यांच्या चारपैकी तीन सामने जिंकले होते, परंतु संघाला त्यांच्या मागील तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघातील अनेक प्रमुख खेळाडू अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरत असून याचा फटका फ्रेंचायझींना सोसावा लागत आहे. व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल या खेळाडूंना कामगिरीत सातत्य दाखवता आलेले नाही. त्याचबरोबर पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्तीसारखे गोलंदाज गोलंदाजीत खूप महागडे ठरत आहेत. अशा स्थितीत फॉर्मात असलेल्या गुजरातसमोर श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून नव्या प्लॅनसह मैदानात उतरावे लागणार आहे.

गुजरात टायटन्सचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, पण संघाची आघाडीची फळी अजूनही अडचणीची आहे. शुबमन गिलला त्याच्या मागील तीन डावात दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. त्याचवेळी मॅथ्यू वेडही त्याचा साथीदार म्हणून अपयशी ठरला आणि त्याच्या जागी आलेला वृद्धिमान साहा पहिल्या सामन्यात फारशी छाप पाडू शकला नाही. मात्र, संघाची मधली फळी जबरदस्त फॉर्मात आहे. कर्णधार हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी संधी मिळेल तेव्हा सामने जिंकवले आहेत. गोलंदाजी विभाग खूपच संतुलित आहे आणि आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहे.

दोन्ही संघांची Playing 11

कोलकाता नाइट रायडर्स – व्यंकटेश अय्यर, सुनील नारायण, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, टिम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, हार्दिक पंड्या (कप्तान), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!