Share

IPL 2022 MI vs CSK : आज चाहत्यांची उत्सुकता शिगेला..! दोन संघात कोण आहे वरचढ? नक्की वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ३३वा सामना खूपच जबरदस्त होणार आहे, कारण स्पर्धेतील दोन यशस्वी संघ आज भिडणार आहेत. एल क्लासिको असे म्हटले जाणाऱ्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ रवींद्र जडेजाच्या चेन्नई सुपर किंग्जशी (MI vs CSK) नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर भिडणार आहे. प्रत्येक आयपीएल हंगामात चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहतात.

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात नेहमीच जोरदार टक्कर राहिली आहे. दोन्ही संघांकडे एकूण ९ आयपीएल ट्रॉफी आहेत. चेन्नई सुपर किंग्सने ४ वेळा आयपीएल आणि मुंबई इंडियन्सने ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे आहे. यंदाच्या हंगामात दोन्ही संघांची सुरुवात खराब झाली आहे. मुंबई इंडियन्सने ६ सामन्यांत सलग ६ पराभव पत्करले आहेत, तर चेन्नईने ६ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे.

मुंबई इंडियन्स संघ हेड टू हेड रेकॉर्डमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या पुढे आहे. त्यांनी १९ तर ​​सीएसकेने १३ सामने जिंकले आहेत. महेंद्रसिंह धोनी हा मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे, ३७ सामन्यांत धोनीने ६८२ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चेन्नईविरुद्ध सात अर्धशतके झळकावली आहेत. जसप्रीत बुमराहने चेन्नईविरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी १२ सामन्यांत ११ विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!