Share

राज्य नेमके किती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मिळून चालवत आहेत?; ‘त्या’ प्रकरणावरून भातखळकरांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील बदल्यांचा आदेश गृहमंत्रालयाने बुधवारी (२० एप्रिल) जारी केला आहे. मात्र १२ तासांच्या आतच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे.

“५ बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला अवघ्या १२ तासांत स्थगिती देण्याचा अलौकिक विश्वविक्रम महाविकास आघाडी सरकारने केला आहे. आदेशही आपलाच आणि स्थगिती ही आपलीच. अर्थात दोन्हीचे कारण अर्थपूर्णच आहे. हे राज्य नेमके किती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मिळून चालवत आहेत?”, असा खोचक सवाल अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत केला आहे.

दरम्यान मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. मात्र यांच्या बढतीला स्थगिती देण्यात आली आहे. गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे भाजपकडून सडकून टीका केली जात आहे. दरम्यान राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे अशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!