Share

पोलार्डतात्या निवृत्त..! IPL 2022 दरम्यान घेतला ‘धक्कादायक’ निर्णय; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ दरम्यान (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने धक्कादायक निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडीजचा कप्तान पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आयपीएलमध्ये उद्या २१ एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी पोलार्डने धक्कादायक निर्णय घेतला.

पोलार्डने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. त्याने लिहिले, ”मी सर्व निवडकर्ते, व्यवस्थापन आणि विशेषत: प्रशिक्षक फिल सिमन्स यांचा माझ्यातील क्षमता पाहिल्याबद्दल आणि संपूर्ण कारकिर्दीत माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आभारी आहे. क्रिकेट वेस्ट इंडीजने माझ्यावर दाखवलेला आत्मविश्वास विशेषतः आश्वासक होता, कारण मी संघाचे नेतृत्व करण्याचे आव्हान पेलण्यासाठी पुढे आलो. कर्णधार म्हणून माझ्या काळात मला पाठिंबा आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल, मी बोडार्चे अध्यक्ष रिकी स्केरिट यांचे आभार आणि कौतुक करू इच्छितो.”

https://twitter.com/CricCrazyJ0hns/status/1516813571782770689

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत पोलार्डने १२३ वनडे सामने आणि १०१ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने वनडेत २६.०२च्या सरासरीने २७०६ धावा केल्या आहेत. यात त्याने ३ शतके आणि १३ अर्धशतकेही झळकावली आहेत. तसेच, गोलंदाजी करताना ५५ विकेट्सही घेतल्यात. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १०१ सामने खेळताना २५.३१च्या सरासरीने १५६९ धावां ठोकल्या आहेतय़. या विभागात त्याने ६ अर्धशतकेही झळकावली आहेत. तर ४२ विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!