🕒 1 min read
मुंबई: भाजप आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांनी रिव्हॉल्वर दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केल्याने मोठी खळबळ माजली आहे. नेरूळ पोलिस ठाण्यात गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल (Rape case filed) करण्यात आला आहे. यावरच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगाला ईमेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिलेने प्रत्यक्षात भेट घेऊन घडलेल्या घटनेचा तपशील आणि तक्रार दिली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन राज्य महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना तपास करण्याचे निर्देश देऊन ४८ तासांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १५ तारखेला गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच १६ तारखेला नेरुळ पोलीस स्थानकात आयपीसी ३७६ हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही पोलीस स्थानकात दाखल झालेले गुन्हे गंभीर स्वरुपाचे असून गणेश नाईक यांना अटक करुन पुढील चौकशी व कारवाई केली जाईल. असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय?
१९९३ साली तक्रारदार महिला वाशी सेक्टर-१७मधील बिग फ्लॅश स्पोर्ट्स क्लब येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यावेळी गणेश नाईक क्लबमध्ये बैठकीसाठी जात असत. ओळख झाल्यानंतर ते मला संपर्क करीत होते. १९९५पासून आमच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यावेळी नाईक मला पारसिक हिल येथील बंगल्यावर घेऊन गेले. आणि त्यांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. पुण्यातही आमच्यामध्ये संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले. असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.
त्यानंतर नोव्हेंबर २००६ मध्ये गणेश नाईक यांच्यापासून गर्भवती राहिल्यानंतर न्यू जर्सी येथे १८ ऑगस्ट २००७ मध्ये या महिलेने मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी नेरूळमधील सीब्रीज टॉवर इमारतीत या महिलेला राहण्यास नेले. ते आठवड्यातून तीन वेळा घरी येत असत. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक शोषण केले, अशी तक्रार या महिलेने केली आहे. दरम्यान या आरोपामुळे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022: धक्कादायक! दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळाडू निघाला कोविड पॉझिटिव्ह, संपूर्ण संघ क्वारंटाईन
- “राज ठाकरेंना जाग आली असेल तर चांगलच आहे” ; किशोरी पेडणेकरांचा टोला
- “मी स्वतः दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण…”, नाना पटोलेंचा राज ठाकरेंना टोला
- “… इफ्तार पार्टीला उपस्थित राहण्याचा आदेश आयुक्तांना सरकारने दिला का?”- नितेश राणे
- “कोण कुणाच्या स्पॉन्सरशीपने राजकारण…”; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
