मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मशिदी विरुद्ध हनुमान चालीसा असा संघर्ष आता पाहावयास मिळत आहे. यावरच नाना पटोले यांनी म्हटले की, “मी स्वतः हिंदू आहे, मी स्वतः दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण मी त्याचा बाऊ करत नाही.”
खरं तर हिंदू-मुस्लीम वाद महागाईवरून लोकांचे लक्ष बाजूला करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. आमची राज्य सरकारला विनंती आहे की, अशा पद्धतीने धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना, मग ते कोणीही असो त्यांना सभा घ्यायला बंधने घातली पाहिजे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. ही मागणी आम्ही काँग्रेसच्या वतीने करतो आहे. असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, कुणालाही आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याला विरोध करण्याचं काही कारण नाही, पण त्याचा जो बाऊ केला जातोय तो अडचणीचा मुद्दा आहे. धार्मिक तेढ निर्माण करून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यातून केंद्रातील सरकारचे अपयश झाकले जात आहे. असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “राजभवनात जाणाऱ्या पैश्याला मधेच पाय फुटले…”- संजय राऊत
- “…धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का?”, नितेश राणेंचा सवाल
- “शिवसेना आणि अयोध्याचं राजकीय नाही तर भावनिक नातं आहे”- संजय राऊत
- “शरद पवारांना बहुजनांचा इतिहास मोडीत काढायचाय” ; गोपिचंद पडळकरांचा हल्लाबोल
- “…म्हणून पवार साहेबांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान”, रोहित पवारांनी विरोधकांना सुनावले


