🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२चे हंगाम अतिशय रोमांचक पद्धतीने पुढे जात आहे. पण याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. अलीकडेच, दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. मात्र आता संघातील एक खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून, त्यानंतर खबरदारी घेत फ्रँचायझीने पुण्याला जाणे रद्द केले आहे.
IPL 2022 मध्ये पुन्हा एकदा कोरोनाने प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे (DC) फिजिओ पॅट्रिक फरहत (Pattrick farhat) हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते आणि दिल्ली संघाने आरसीबीसोबत सामना खेळला. यानंतर दिल्ली २० तारखेच्या सामन्यासाठी पुण्याला जाणार होती. मात्र एक विदेशी खेळाडू जो मागच्या सामन्यात खेळला होता तोच पॉझिटिव्ह आल्याने दिल्लीने जाणे रद्द केले आहे.
Delhi Capitals has canceled today's scheduled travel to Pune for the match in #IPL2022 – a player has been tested positive and he will undergo RT-PCR test to confirm the result. (Source – Cricbuzz)
— Johns. (@CricCrazyJohns) April 18, 2022
रॅपिड अँटीजेन अहवालात दिल्ली कॅपिटल्सच्या एका खेळाडूला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना मुंबईत क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता १८ आणि १९ एप्रिल रोजी सर्व खेळाडूंची कोविड-१९ टेस्ट केली जाईल. दिल्लीचा पुढील सामना बुधवारी (२० एप्रिल) पुण्यात पंजाब किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. मात्र, या घटनेनंतर बीसीसीआय पुढील कारवाईचा विचार करत आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “राज ठाकरेंना जाग आली असेल तर चांगलच आहे” ; किशोरी पेडणेकरांचा टोला
- “मी स्वतः दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण…”, नाना पटोलेंचा राज ठाकरेंना टोला
- “… इफ्तार पार्टीला उपस्थित राहण्याचा आदेश आयुक्तांना सरकारने दिला का?”- नितेश राणे
- “कोण कुणाच्या स्पॉन्सरशीपने राजकारण…”; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
- “राजभवनात जाणाऱ्या पैश्याला मधेच पाय फुटले…”- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
