🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत मोठी भुमिक घेतली आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. तर यालाच प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार आहे. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज (१६ एप्रिल) संध्याकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी थेट शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर टीका केली आहे.
“सत्तेपुढे शिवसेनेचे हिंदुत्व गौण. नुसत्याच हिंदुत्वाच्या गप्पा मारायचा, मात्र उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसने हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी घेणार असं जाहीर करूनही त्यावर मुख्यमंत्री, शिवसेना गपगुमान आहे. कारण सत्ता महत्त्वाची आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे असते तर असे कधीच झाले नसते.”, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
सत्तेपुढे शिवसेनेचे हिंदुत्व गौण नुसत्याच हिंदुत्वांच्या गप्पा मारायचा मात्र उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसने हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी घेणार असं जाहीर करूनही त्यावर मुख्यमंत्री, शिवसेना गपगुमान. कारण सत्ता महत्त्वाची. माननीय बाळासाहेब ठाकरे असते तर कधीच झाल नसत
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 16, 2022
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर आणि भाई कात्रे यांनी या रोजा इफ्तारचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मनसेच्या भूमिकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले असल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- एवढं धडधडीत खोटं बोलण्याची ‘ऊर्जा’ कुठून मिळते?; भातखळकरांचा नितीन राऊत यांना टोला
- “अंगावर शाॅल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब…”, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला
- IPL 2022 : सनरायझर्स हैदराबाद कडून विजयाची हॅट्ट्रिक! KKRचा ७ विकेट्सने पराभव
- IPL 2022 : राणा – रसेलच्या खेळीने कोलकाता सुसाट! सनरायझर्सपुढे १७६ धावांचे लक्ष्य
- IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का; दीपक चहर स्पर्धेतून बाहेर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
