🕒 1 min read
अमरावती : भाजपचे नते व माजी कृषिमंत्री अनिल बोंडेंना यांना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिन्यांचा कारावास व वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हे २०१६ मधील प्रकरण आहे. आज या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे. सदर निकालात बोंडेंना शिक्षा झाली आहे.
सप्टेंबर २०१६ मध्ये वरुडचे नायब तहसीलदार यांच्यासोबत शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा वरुड पोलीस स्थानकामध्ये अनिल बोंडेंवर दाखल झाला होता. आज या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली. ज्यामध्ये ही शिक्षा सुनवण्यात आली.
या प्रकरणी अनिल बोंडेंना आजच जामीन देखील मिळाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयाकडे दाद मागणार आहोत, असे अनिल बोंडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :


