Share

गिलख्रिस्ट आणि रोहितचा डेक्कन चार्जर्स संघ आठवतोय का? आता हा संघ का खेळत नाही?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल सुरू झाले तेव्हा डेक्कन चार्जर्स हैदराबाद हा संघ आठ संघांपैकी एक होता. पहिल्या सत्रातील खराब कामगिरीनंतर या संघाने २००९मध्ये विजेतेपद पटकावले. आयपीएलचा हा हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट या संघाचा कर्णधार तर रोहित शर्मा उपकर्णधार होता.

चौथ्या हंगामात कुमार संगकाराने संघाचे कर्णधारपद स्वीकारले. खेळाडूंच्या बंदीमुळे हा संघ नंतर विक्रीसाठी ठेवण्यात आला होता, परंतु एक बोली लागल्यामुळे ही बोली नाकारण्यात आली. हे सर्व २०१२मध्ये घडले होते. याच वर्षी १४ सप्टेंबरला कराराच्या अटींचा भंग केल्याबद्दल आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने संघावर कायमची बंदी घातली होती. यानंतर नवीन संघाचे नाव सनरायझर्स हैदराबाद असे ठेवण्यात आले.

यानंतर २०२०मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकरणाने संघाच्या बाजूने निर्णय दिला आणि डेक्कन चार्जर्सला रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर घोषित केला. संघाची मालकी असलेल्या डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग लिमिटेड या कंपनीला बीसीसीआयकडून ४८०० कोटींहून अधिक नुकसानभरपाई आणि २०१२ पासून १० टक्के व्याजासह ही रक्कम देण्यात यावी, असा निर्णय सुनावण्यात आला.

फ्रेंचायझीने सुरुवातीला अॅडम गिलख्रिस्ट, अँड्र्यू सायमंड्स, शाहिद आफ्रिदी, स्कॉट स्टायरिस आणि हर्शेल गिब्स या स्टार खेळाडूंचा समावेश केला. आरपी सिंग, नुवान जोयसा आणि चामिंडा वास हे फ्रेंचायझीने खरेदी केलेले प्रमुख गोलंदाज होते. रोहित शर्मा, वेणुगोपाल राव आणि प्रज्ञान ओझा हे इतर भारतीय खेळाडू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!