🕒 1 min read
मुंबई: ईडी अधिकाऱ्यांवरील गंभीर आरोपांबाबत मुंबई पोलीसांची एसआयटी (SIT) नेमण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करणार असून त्यांना तपासासाठी आवश्यक वेळ देण्यात येईलं, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी आज सांगितले आहे.
तसेच विरोधकांद्वारे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी सांगितले की, यासंदर्भात तपास करून पुढील निर्णय घेऊ. अलीकडच्या काळात काही पक्षांच्या माध्यमातून प्रक्षोभक भाषणं करून समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ही बाब राज्य व देशाच्या सामाजिक सलोख्याच्या दृष्टीकोनातून बरोबर नसल्याचे गृहमंत्री म्हणाले.
नाशिकच्या पोलिस आयुक्तांच्या पत्र प्रकरणाबाबत सदर गोष्ट त्यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली पाहिजे, असे मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केले. तसेच स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना पोलीस प्रशासन घेईल. पोलिसांना त्यासाठी वेगळे आदेश देण्याची गरज नाही, ते त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडतात, असे गृहमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता लखनऊचे शिलेदारही धावणार; मुंबईच्या पोराला देणार आव्हान!
“ये लो कॅलरी जेवण…” रितेश देशमुखचा ‘हा’ मजेदार व्हिडिओ पाहिलात का?
“…दंगल वगैरे सगळ्या राष्ट्रवादीला हव्या असलेल्या गोष्टी”; मनसेचे टीकास्त्र
महागाई आणि बेरोजगारीचे काय? नाना पटोलेंचा केंद्राला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
