🕒 1 min read
मुंबई : केएल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२२मध्ये आपला दुसरा विजय नोंदवला आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊने सनरायझर्स हैदराबादचा १२ धावांनी पराभव केला. हैदराबादचा हा सलग दुसरा पराभव आहे. या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊचा कप्तान केएल राहुल आणि स्फोटक फलंदाज दीपक हुडा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनऊने हैदराबादला १७० धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात हैदराबादला २० षटकात ९ बाद १५७ धावांपर्यंतच पोहोचता आले.
हैदराबादचा डाव
अभिषेक शर्मा आणि कप्तान केन विल्यमसन यांनी हैदराबादच्या डावाची सुरूवात केली. संयमी सुरुवात केलेल्या विल्यमसनला लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खानने फसवले. त्याने हैदराबादच्या कॅप्टननला वैयक्तिक १६ धावांवर अँड्र्यू टायकरवी झेलबाद केले. त्यानंतर आवेशने अभिषेकलाही (११) बाद केले. राहुल त्रिपाठीने हैदराबादचा डाव सांभाळला. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावा केल्या. कृणाल पंड्याने त्याला तंबूत धाडले. त्यानंतर निकोलस पूरनने संघाची धावगती वाढवली. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांसह ३४ धावा केल्या आवेश खानने १८व्या षटकात त्याला आणि अब्दुल समदला बाद करत सामन्याचे चित्र पालटले. वॉशिंग्टन सुंदरने (१८) हैदराबादसाठी झुंज दिली खरी, पण ती अपयशी ठरली. हैदराबादला २० षटकात ९ बाद १५७ धावांपर्यंतच पोहोचला आले. लखनऊकडून आवेश खानने २४ धावांत ४ बळी घेतले. जेसन होल्डरला ३ तर कृणालला २ बळी घेता आले.
लखनऊचा डाव
सनरायझर्स हैदराबादचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने क्विंटल डी कॉक (१) आणि एविन लुईस (१) यांना स्वस्तात बाद करत लखनऊला सुरुवातीला मोठे धक्के दिले. मनीष पांडेसुद्धा (११) मोठी खेळी करू शकला नाही. पॉवरप्लेमध्ये तीन फलंदाज गमावल्यानंतर दीपक हुडा आणि कप्तान केएल राहुलने डाव सावरला या दोघांनी संघाची धावसंख्या शतकापार पोहोचवली. हुडाने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. रोमारियो शेफर्डने त्याला बाद केले. राहुलनेही संयमी अर्धशतकी खेळी केली. १९व्या षटकात टी. नटराजनने त्याला पायचीत पकडले. राहुलने ६ चौकार आणि एका षटकारासह ६८ धावा केल्या. शेवटच्या षटकात आयुष बदोनी आणि जेसन होल्डर यांनी फटकेबाजी केली. २० षटकात लखनऊने ७ बाद १६९ धावा केल्या. हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर, रोनारियो शेफर्ड आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing XI
सनरायझर्स हैदराबाद – केन विल्यमसन (कप्तान), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, अब्दुल समद, रोमारियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक.
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : ये दर्द तुम नही समझोगे..! विराटनं सांगितल्या ‘त्या’ दोन सामन्यांच्या कटू आठवणी; पाहा VIDEO
- “मी स्वत: मागासवर्गीय समाजातून…”, राज ठाकरेंच्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
- मनसेचा हनुमान चालीसा कार्यक्रम पोलिसांकडून रद्द!
- उद्धवजी पुन्हा सांगतो सावध राहा! राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा सल्ला
- “शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनणार नाही, म्हणून…”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
