Share

“शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनणार नाही, म्हणून…”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू लागले आहे. असे असतांनाच शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनणार नाही, म्हणून लोक आपल्या भाषणांमध्ये हमखास त्यांचे नाव घेतात, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले की,‘पवार साहेबांमुळेच महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले. त्यामुळे पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय बातम्यांमध्ये हेडलाईन होत नाही म्हणून लोक हमखास आपल्या भाषणांमध्ये पवार साहेबांचे नाव घेतात,’ असे आव्हाड म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘महाराष्ट्र पेटेल असे काही वक्तव्य कोणीही करू नये. दोन वर्षांच्या कोरोना प्रादुर्भावानंतर लोकं पुन्हा कामाला लागले आहेत. एकतर लोकांच्या खिशामध्ये पैसे नाहीत. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, भाज्या, केरोसिन व दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दर महागले आहेत. मात्र यावर कुणीच बोलताना का दिसत नाही?’, असा सवालही आव्हाड यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!