🕒 1 min read
मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. या मुद्यावरून राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मनसे म्हणजे भाजपची सी टीम असल्याचा उल्लेख केला. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या टीकेला आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संदीप देशपांडे म्हणाले की,‘मला वाटते की शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे. तसेच ज्या पद्धतीने यांचा भ्रष्टाचार चालू आहे, त्यानुसार कुठे कुठे पैसे खाल्ले याचा हिशोब त्यांनी ईडीला द्यावा. आमच्याबद्दल बोलण्याची काहीच गरज नाही,’ असे देशपांडे म्हणाले.
दरम्यान, ‘जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार करायला हवा. हिंदुत्वाकरीता नेहमीच लढण्याची गरज नाही. राजकीय पक्ष म्हणून जी वचन देतो ती पूर्ण करणेही हिंदुत्व आहे. ते नेहमीच टाईमपास करायचे म्हणून मी मनसेला टाइमपास टोळी म्हणायचो. परंतु, आता मला चांगलं वाटतंय की भाजपची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळाले आहे.’ तसेच भाजपची बी टीम एमआयएम असून सी टीम मनसे आहे, असे प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- “भाजपची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम…”, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
- “राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत तोपर्यंत…”, रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य
- “…तर आम्ही एक मिनिटात पलटी मारतो”; सुजय विखे पाटलांचं मोठं वक्तव्य
- मनसेने शिवसेनेचा ‘वीरप्पन गँग’ म्हणून केला उल्लेख; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- “राज ठाकरे कधी आयुष्यात जय भीम म्हणाले का?” – आव्हाडांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
