Share

IPL 2022: गुजरात सोबतची कामगिरी बघता हार्दिकची लागू शकते लॉट्री! T20 WCसाठी मार्ग मोकळा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या IPL 2022 मध्ये कहर करताना दिसत आहे. चालू हंगामात, तो गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (GT vs DC) सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. दिल्लीविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात त्याने त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर टीम सेफर्टला त्याच्या धडाकेबाज चेंडूने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिक पुन्हा लयीत आला आहे ही भारतीय संघासाठी आनंदाची बाब आहे.

दिल्ली (DC) विरुद्ध नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने १७१ धावा केल्या. दुसरीकडे, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का स्वतः कर्णधार हार्दिक पंड्याने दिला. दिल्लीच्या डावाच्या दुसऱ्या षटकात जबाबदारी स्वीकारत हार्दिक (Hardik pandya) गोलंदाजी करायला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर टीम सेफर्टला (tim seipert) शॉर्ट लेन्थ बॉलवर मिड-विकेटच्या दिशेने झेलबाद केले.

https://twitter.com/MohitKu38157375/status/1510293692489543680?s=20&t=1ybGVqoZR83O6iG7sk6IQA

हार्दिकने दीर्घकाळ पाठीच्या दुखापतीशी झुंज दिल्यानंतर आयपीएल २०२२ मध्ये पुनरागमन केले आहे. २०२१ च्या T20 विश्वचषकापूर्वी तो दुखापतीने त्रस्त होता, त्यामुळे त्याला गोलंदाजीत खूप त्रास सहन करावा लागला होता. पण आता आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये हार्दिक १४० किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करताना दिसत आहे. यादरम्यान त्याच्या शरीराची स्थितीही सुधारली आहे. जे टीम इंडियासाठी देखील एक चांगले संकेत आहे, कारण या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत हार्दिक हा भारतीय संघाचा महत्त्वाचा दुवा ठरू शकतो.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!