नांदेड : स्वर्गीय गंगाधरराव देशमुख यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री एकाच मंचावर दिसले. काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या कार्यक्रमामध्ये भाषण करताना बुलेट ट्रेनचा मुद्दा मांडला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मत मांडलं आहे.
विदर्भात बुलेट ट्रेन जातीय, त्याप्रमाणं नांदेड मार्गे हैदराबादला जावी, ती मराठवाड्यात यावी, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. यावर फडणवीस म्हणाले, हैदराबाद पर्यंतच्या बुलेट ट्रेनला मी पाठींबा देतो पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना समजावा की मुंबईतील बुलेट ट्रेनचे काम थांबवू नका, असं देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमावेळी भाषणात म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –

