🕒 1 min read
मुंबई : आयपीएलच्या १५ व्या मोसमातील १० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये गुजरातने दिल्लीवर अवघ्या १४ धावांनी मात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना टायटन्स संघाने १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला ९ गडी गमावून केवळ १५७ धावा करता आल्या आणि त्यांनी १४ धावांनी सामना गमावला. मात्र, सामना हरल्यानंतरही दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने इतिहास रचला आहे.
आक्रमक विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (rishabh pant) २०१६ पासून दिल्ली कॅपिटल्सशी (DC) जोडला गेला आहे. प्रत्येक हंगामानुसार त्यांच्या खेळात सुधारणा होत आहे. यासोबतच तो प्रत्येक मोसमात संघासाठी महत्त्वाच्या धावा करताना दिसतो. अशा परिस्थितीत पंतने विशेष कामगिरी केली आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी ते केले आहे जे वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीरसारखे फलंदाजही या फ्रेंचायझीसाठी करू शकले नाहीत.
गुजरात टायटन्सविरुद्ध ४३ धावा करून दिल्लीसाठी २५०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा पहिला खेळाडू ठरला आहे. या फ्रँचायझीसाठी कोणताही फलंदाज हा करिष्मा करू शकला नाही. ऋषभ पंतने दिल्लीसाठी कर्णधार म्हणूनही अप्रतिम कामगिरी केली आहे. ज्यामुळे त्याच्या कर्णधारपदात दिल्ली त्यांचे पहिले जेतेपद मिळवेल अशी आशा चाहत्यांना आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “काका धर्माला वाचवा”, सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना खोचक टोला
- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे गरोदर; पतीला कल्पनाच नाही?
- IPL 2022: दिल्लीने पहिला सामना गमावताच डेव्हिड वॉर्नरचे भारतात आगमन; ‘या’ तारखेला सामना खेळणार
- “जिल्हाध्यक्ष हटाव राष्ट्रवादी काँग्रेस बचाव” – पोस्टर्समुळे उडाली खळबळ
- IPL 2022: ललित यादवच्या रन आऊटवरून गोंधळ; पंतची अंपायरशी हुज्जत, वाचा नेमके काय झाले?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
