🕒 1 min read
मुंबई : गुजरात विरुद्ध सामना गमवल्यानंतर दिल्लीचे चाहते दुखी झाले होते. मात्र त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी येत आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नर आयपीएल २०२२ साठी भारतात आला आहे. होय! वॉर्नर अखेर आयपीएलसाठी भारतात आला आहे आणि लवकरच तो अॅक्शनमध्ये दिसणार आहे.
डेव्हिड वॉर्नरने (David warner) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो मुंबईत दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये चाहत्यांना प्रश्न विचारला की, “मी कुठे आहे याचा अंदाज लावा.” वॉर्नरच्या पोस्टवर टिप्पणी करताना, दिल्ली कॅपिटल्स (DC) म्हणाले, “एक्स्प्रेस वेवर जा आणि आम्हाला पुण्याला भेट.” वॉर्नर मुंबईत पोहोचला असून तो लवकरच दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होणार असल्याची पुष्टी झाली आहे. वॉर्नर IPL 2022 चा पहिला सामना ७ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळताना दिसणार आहे.
पाकिस्तान दौरा खेळून डेव्हिड वॉर्नर आता आयपीएल खेळण्यासाठी तय्यार झाला आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये, दिल्ली कॅपिटल्सने डेव्हिड वॉर्नरवर ६. २५ कोटींची मोठी देत आपल्या संघात समावेश केला.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: ललित यादवच्या रन आऊटवरून गोंधळ; पंतची अंपायरशी हुज्जत, वाचा नेमके काय झाले?
- अभिनेत्री शर्मिला शिंदेची वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर प्रतिक्रिया
- चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींचा जोरदार टोला; म्हणाले,“आता धौती योग घेतल्याशिवाय पर्याय नाही”
- “राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले” – किशोरी पेडणेकर
- “पाकिस्तानची संसद बरखास्त करा” – इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
