🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कमध्ये केलेल्या भाषणावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. राज ठाकरे यांचं कालचं भाषण भाजपने लिहून दिलेल्या स्क्रिप्ट सारखं होतं. बऱ्याच मनसैनिकांनी आमच्याशी रात्री चर्चाही केली. असे बोलत त्यांनी हल्ला चढवला.
पुढे म्हणाल्या, “आम्हाला वाटलं दोन वर्षाची मोरी तुंबलीय. त्या मोरीतून काही तरी निघेल असं वाटलं होतं. पण त्यातून काही निघालं नाही. तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले, असा जोरदार हल्ला किशोरी पेडणेकर यांनी केला. काल ते म्हणाले, मला कडेवर घ्या ना, मला कडेवर घ्या ना…खरं तर ते आमच्यासाठी नव्हतं. हा त्यांचाच त्यांच्यासाठी प्रयत्न होता”, असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी लगावला.
अशा पद्धतीने महाराष्ट्रात शिवसेनेचा द्वेष करून कोणीही मोठा झाला नाही. मुंबईकर पूर्ण ओळखून आहेत. पण कालच्या राजकारणामुळे लोकांना कळलं. बाळासाहेबांचे सुपूत्रं आणि नातू हेच त्यांचे उत्तराधिकारी आहे. बाकी ड्युपलिकेट लोकांचे काम नाही, असा थेट टोला त्यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या –
“पाकिस्तानची संसद बरखास्त करा” – इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस
“…व्वा रे रक्तपिपासू व्यापारी मोदी सरकार”, नाना पटोलेंचा हल्लाबोल
PAK vs AUS: बाबरचे रेकॉर्ड मेकिंग शतक; कोहलीही करू शकला नाही ‘अशी’ कामगिरी!
“…त्या पक्षात जातीवाद असूच शकत नाही”, राजे ठाकरेंच्या टीकेवर रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर
बाहुबली’ फेम राणा दग्गुबातीच्या चाहत्यांना आनंदाची बातमी! लवकरचं होणार बाबा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
