🕒 1 min read
मुंबई : सलामीवीर फलंदाज जोस बटलरची शतकी खेळी आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्ससमोर २० षटकात ८ बाद १९३ धावा उभ्या केल्या आहेत. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बटलरने मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढत ६८ चेंडूत १०० धावा ठोकल्या, तर शिमरोन हेटमायरने १४ चेंडूत ३५ धावा ठोकत त्याला उत्तम साथ दिली.
राजस्थान रॉयल्सचा डाव
जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. जयस्वाल (१) या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. जसप्रीत बुमराहने त्याला टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. देवदत्त पडिक्कल (७) टायमल मिल्सचा बळी ठरला. त्यानंतर कप्तान संजू सॅमसनने १ चौकार आणि ३ षटकारांसह वादळी ३० धावा केल्या. कायरन पोलार्डने सॅमसनचा अडथळा दूर केल्यानंतर मैदानात आला शिमरोन हेटमायर. त्याने पोलार्डच्या एका षटकात २६ धावा लुटल्या. दरम्यान एका बाजूने फटकेबाजी करणाऱ्या बटलरने आपले दुसरे आयपीएल शतक फलकावर लावले. १९व्या षटकात बुमराहने हेटमायर आणि बटलरला माघारी धाडले. त्यामुळे राजस्थानला दोनशेपार जाता आले नाही. हेटमायरने १४ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांस ३५ तर बटलरने ११ चौकार आणि ५ षटकारांसह १०० धावा केल्या. राजस्थानने २० षटकात ८ बाद १९३ धावा केल्या. शेवटच्या २ षटकात राजस्थानने ५ फलंदाजांना गमावत फक्त ११ धावा काढल्या. बुमराहने १७ धावांत ३ तर टायमल मिल्सने ३५ धावांत ३ बळी टिपले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, यजुर्वेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिध कृष्णा.
महत्त्वाच्या बातम्या –
- “अलबत्या गलबत्या कोण फोडेल”, ‘जत्रा २’ चित्रपटाचा टीजर पाहिलात का?
- IPL 2022 : हाऊ इज द जोश..! मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढत बटलरनं ठोकलं शतक; पाहा VIDEO
- गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर सुभाष घई यांच्या ‘माय डॅड्स वेडिंग’ चित्रपटाचे पोस्टर आउट
- IPL 2022 : जबरदस्त..! मुंबईविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसननं ठोकलं द्विशतक
- IPL 2022 : एकेकाळी मुंबईसाठी खेळणाऱ्या बटलरनं मुंबईलाच धुतलं; एका ओव्हरमध्ये ठोकल्या २६ धावा!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
