🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत आज मुंबईत मराठी भाषा भवनासाठीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी उप मुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी मराठी भाषेविषयी अनास्था असल्याचे म्हणत खंत व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित केले. मात्र यावेळी अजित पवारांची टोलेबाजीही दिसून आली. ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हास्य निर्माण झाले.
यावेळी अजित पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मराठी भाषा भवनासाठी महसूल विभागानं तातडीने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, “बऱ्याच वेळा एखाद्या विभागाची जागा एखाद्या प्रकल्पासाठी हवी असेल, तर त्या विभागाच्या मंत्र्याला वाटतं की आपल्याच जवळजी जागा द्यायची आहे. तो आखडूनच बसतो. देतच नाही. काही ना काही कारणं काढतो. मला कळतच नाही. मी म्हणतो आरे किती दिवस? जोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे विभाग दिला आहे, तोपर्यंत विभाग आहे. उद्या काढून घेतला तर दुसऱ्याकडे जाईल. पण हा एक मनुष्यस्वभाव आहे. त्याचा अनुभव गेल्या ३० वर्षाच्या राजकीय जीवनात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आला आहे. मुख्यमंत्र्यांनाही गेल्या अडीच वर्षांत त्याचा थोडाबहुत अनुभव आला आहे.”, अशी टोलेबाजी अजित पवारांनी यावेळी केली.
दरम्यान यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या मराठीचे कौतुक करत म्हटले की, उद्धवजींची मराठी भाषा आम्ही जवळून अनुभवतोय. त्यांची मराठी भाषा वेगळी आहे. हळूहळू बोलत असताना ते गुदगुल्या करतात. शालजोडीतून मधूनच समोरच्याचे वस्त्रहरण करणारी उद्धव ठाकरेंची मराठी भाषा आहे. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अस्त्र आहे.”
महत्वाच्या बातम्या:
“…तर आपल्या भाषेचा विकास कसा होईल?”, अजित पवारांनी व्यक्त केली खंत
IPL 2022: …..अन् शाहरुख आऊट झाल्यावर श्रेयसनं केलं ‘किंग खान’ स्टाईलनं सेलिब्रेशन; पाहा VIDEO!
नारायण राणेंची उच्च न्यायालयाकडे FIR रद्द करण्याची मागणी!
काश्मिरी पंडितांवर बोलताना प्रीती गांधींनी शरद पवारांवर साधला निशाणा
“…तेव्हा कर्ते करविते देवेंद्र फडणवीसांचे नाव घेतले जाईल”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
