🕒 1 min read
मुंबई : टीम इंडियाने ११ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (२ एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इतिहास रचला होता. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करून २८ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या विजयात प्रत्येक खेळाडूचे महत्त्वाचे योगदान होते. यामध्ये विराट कोहलीचाही सहभाग होता. अंतिम सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध ३५ धावा केल्या होत्या. कोहलीलाही हा दिवस चांगलाच लक्षात आहे.
या विजयाला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विराटची आयपीएल फ्रेंचायझी आरसीबीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने ऐतिहासिक विजयासंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. विराट म्हणाला, “विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मी फलंदाजीसाठी मैदानात जात होतो, ते मला अजूनही आठवते. तेव्हा दोन विकेट लवकर पडल्या होत्या. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग दोघेही बाद झाले. जेव्हा मी फलंदाजीसाठी उतरत होतो, तेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या सचिन पाजीने मला मोठी भागीदारी करण्यास सांगितले. यानंतर गौतम गंभीर आणि मी ९० धावांची भागीदारी केली (खरेतर तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावा). तेव्हा मी ३५ धावा केल्या होत्या.”
“त्या ३५ धावा माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. मी या माझ्या कारकिर्दीतील सर्वात मौल्यवान ३५ धावा मानतो. संघात पुनरागमन करण्यात मी योगदान देऊ शकलो याचा मला आनंद झाला. एकदिवसीय विश्वचषक जिंकल्याचा आनंद वर्णन करू शकत नाही. सर्वजण वंदे मातरम म्हणत जो-जिता वही सिकंदरच्या घोषणा देत होता. हा एक क्षण मी कधीच विसरू शकत नाही”, असे विराटने म्हटले.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ६ गडी बाद २७४ धावा केल्या होत्या. श्रीलंकेसाठी महेला जयवर्धनेने शतक झळकावले. प्रत्युत्तरात भारताने ४ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले होते. भारताकडून गौतम गंभीरने सर्वाधिक ९७ धावा केल्या. त्याचबरोबर ९१ धावांची जबरदस्त खेळीही खेळली. त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : जडेजाच्या CSKचं टेन्शन दूर होईना..! एक खेळाडू रुग्णालयात, तर दुसरा…
- “शेतकऱ्यांचा आक्रोश तुमच्या बंद कानावर पडतो का पवार साहेब?”, सदाभाऊंचा सवाल
- IPL 2022: डबल हेडरचा दुसरा सामना गुजरात – दिल्लीत रंगणार; जाणून घ्या कोणता संघ ठरेल वरचढ
- “सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारल्या जात आहेत” – उद्धव ठाकरे
- मलायकावरुन होणाऱ्या ट्रोलिंगबाबत अर्जुन कपूरने दिले सडेतोड उत्तर
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
