मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते अनेकदा एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते.या ट्रोलिंगवर अर्जुन कपूरने सडेतोड उत्तर दिली आहेत.
अर्जुन कपूरला एका मुलाखतीत विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, “भारतातील लोकांना गॉसिप करणे फार आवडते. देशात आजकाल प्रत्येकजण सासू असल्याप्रमाणे किंवा बायकांसारखे वागत आहेत. त्यांना इतरांच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करणे आवडते. जर दोन लोकांना भविष्यात एकत्र यायचे असेल तर त्या जोडप्याचा आपण आदर करायला हवा.”
आपल्याकडे सर्व लोकांना इतरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडते. पण लोक तुमच्याबद्दल जितके जास्त बोलतात तितकेच तुमचे नाते आणखी मजबूत होते. जर तुम्ही एखादे नवे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा सर्वात आधी सन्मान करा आणि बाहेर येऊन जगाला तुम्ही एकत्र आहात असे ओरडून सांगा. जेव्हा आम्ही एकत्र बाहेर पडतो, फिरतो, फोटो काढतो. त्यावेळी अनेकजण आमच्याबद्दल चांगलं वाईट लिहितात, बोलतात”, असेही अर्जुन कपूर म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :


