🕒 1 min read
मुंबई: डबल हेडरचा गुजरात टायटन्सचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल. आयपीएल २०२२ मधील हा १० वा सामना असेल. दोन्ही संघांबद्दल मनोरंजक गोष्ट म्हणजे दोन्ही संघांनी (GT vs DC) स्पर्धेचा पहिला सामना जिंकला आहे. अशा स्थितीत दोन विजेत्या संघांमधील सामना खूपच रोमांचक होणार आहे.
DC संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात एमआय संघाचा ४ गडी राखून पराभव करून स्पर्धेची विजयी सुरुवात केली. पहिल्या सामन्यात कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली आणि पृथ्वी शॉ, ललित यादव, अक्षर पटेल यांनी उत्कृष्ट फलंदाजीमुळे १७७ धावांचे लक्ष्य गाठले, या सामन्यातही संघाने त्यांच्यापेक्षा चांगली कामगिरी केली, अशी आशा आहे.
दुसरीकडे, GT संघानेही स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात एलएसजी संघाचा ५ गडी राखून पराभव केला आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करताना ३ बळी घेतले तर राहुल तेवतियाच्या नाबाद ४० धावांच्या खेळीमुळे जीटी संघही सामना जिंकण्यात यशस्वी ठरला, या सामन्यातही संघाला आपल्या सर्व खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- मलायकावरुन होणाऱ्या ट्रोलिंगबाबत अर्जुन कपूरने दिले सडेतोड उत्तर
- IPL 2022 MI vs RR : दोन्ही संघात बदल होण्याची शक्यता; वाचा संभाव्य Playing XI!
- IPL 2022: पंजाबच्या भानुका राजपक्षेने सांगितले निवृत्ती घेण्याचे कारण ; श्रीलंका बोर्डसंबंधी मोठे वक्तव्य
- “…त्यामुळे काहीजण सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारतात”, मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र
- IPL 2022: ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोलकात्याच्या खेळाडूंचा बोलबाला, आरसीबीचे हसरंगा आणि फाफ राहिले मागे!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
