Share

“शेतकऱ्यांचा आक्रोश तुमच्या बंद कानावर पडतो का पवार साहेब?”, सदाभाऊंचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला भेटणारे शेतकरी आजही मला कृषिमंत्री समजतात, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, या विधानाचा संदर्भ देत आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. तसेच शेतकऱ्यांचा आक्रोश कधी तुमच्या बंद कानांवर पडणार आहे का पवार साहेब?, असा सवालही सदाभाऊ यांनी केला आहे.

ऊस जळल्यामुळे आक्रोश व्यक्त करणाऱ्या, मरणाची याचना करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ ट्विट करत या व्हिडिओला पवार याचं विधान उपरोधिकपणे सदाभाऊ खोत यांनी जोडलेले आहे.

यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, ‘महावितरणच्या गलिच्छ कारभारामुळे ऊस पार जळाल्याने आता काय करावं म्हणत, जळालेला ऊस हातात घेऊन मरण्याचा पर्याय राहिलाय असं सुचवणाऱ्या त्या बाई सारख्या शेतकऱ्यांचा आक्रोश कधी तुमच्या बंद कानावर पडणार आहे का पवार साहेब? भेटतात का साहेब तुम्हाला असे शेतकरी?’, असे खोत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!