🕒 1 min read
मुंबई : आज (२ एप्रिल) जीएसटी भवनाच्या इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच सरकारमध्ये रुसवे, फुगवे सुरू असल्याचे वातावरण तयार केले जात आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,‘विरोधकांकडून एक वातावरण तयार केले जात आहे, की सरकारमध्ये कुठेतरी रुसवे, फुगवे सुरू आहेत. परंतु तसे काहीच नाही.’ तसेच आपण जे सरकार स्थापन केले, त्याचे नावच महाविकास आघाडी आहे, असेही ठाकरे म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार राहूल शेवाळे, विधान परिषद सदस्य आर. तमिल सेलवन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- “जे आहेत मेट्रोचे मारेकरी ते बनले उद्घाटनकरी”, भातखळकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
- गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार?
- साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?; भातखळकरांनी व्यक्त केली शंका
- पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय नेत्यांकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
- आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन; फडणवीसांना निमंत्रण न दिल्याने लढाई..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
