Share

“हे कमर्शियल आर्टिस्ट येतात अन्..” कुशल बद्रिकेने सांगितला सिद्धार्थ जाधवचा किस्सा

Published On: 

मुंबई : कुशल बद्रिके चला हवा येऊ द्या’मुळे घराघरांत लोकप्रिय झाला आहे. नुकतंच एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेता कुशल बद्रिकेने सिद्धार्थ जाधवची एक भावूक आठवण सांगितली आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१’ या पुरस्कार सोहळ्याचे चित्रीकरण नुकतंच पार पडले. या कार्यक्रमात धुरळा चित्रपटासाठी सिद्धार्थ जाधवला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार अभिनेत्री स्मिता जयकर आणि कुशल बद्रिकेच्या हस्ते त्याला प्रदान करण्यात आला. सिद्धार्थ हा पुरस्कार स्वीकारत असताना कुशल बद्रिकेने त्याची एक जुनी आठवण यावेळी सांगितली.

“मी जेव्हा सिनेसृष्टीत आलो तेव्हा त्याने मला मोलाची संधी मिळवून दिली होती. एकदा एका स्पर्धेत अचानक सिद्धू हे छोटं मोठं काम करत होतो. तेव्हा मी रंगभूमीवर काम करत होतो. त्यावेळी सिद्धार्थची एन्ट्री झाली होती. सिद्धार्थची एन्ट्री झाली तेव्हा मी म्हटलं होतं की हे साले कमर्शियल आर्टिस्ट येतात आणि बक्षिसं घेऊन जातात आणि त्यानंतर कसं कोण जाणे त्या स्पर्धेत सिद्धार्थचा द्वितीय क्रमांक आला होता आणि प्रथम क्रमांक माझा आला होता.”

“तेव्हा सिद्धार्थने नाटकामध्ये काम करशील का? असे विचारलं होतं. यानंतर माझं राम भरोसे हे पहिलं कमर्शिअल नाटक आलं होतं. तिथून माझा प्रवास सुरु झाला. आज या रंगमंचावर सिध्दार्थचा पहिला नंबर आला आणि ते चक्र आज पूर्ण झालं.” असे कुशल बद्रिके म्हणाला.

महत्वाच्या बातम्या :

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार?
“जे आहेत मेट्रोचे मारेकरी ते बनले उद्घाटनकरी”, भातखळकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
मिस युनिव्हर्स हरनाज संधू ‘या’ आजाराशी देतेय झुंज; स्वतः केला खुलासा
IPL 2022: डबल हेडर धमाका ! मुंबईला आज राजस्थान भिडणार ; जाणून घ्या हेड टु हेड सामन्यात कोणाचे राहील वर्चस्व
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB पंच प्रभाकर साईलचा मृत्यू; मोहित कंबोज यांनी केली ‘ही’ मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!