मुंबई : आयपीएल २०२२चा नववा सामना बलाढ्य संघ मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात आज खेळवला जाईल. मुंबईच्या नजरा पहिल्या विजयावर आहेत, तर राजस्थानचा संघ विजयी मोहीम कायम राखण्याचा प्रयत्न करेल. राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवचे मुंबई संघात पुनरागमन झाले आहे. अशा स्थितीत संघात बदल होण्याची शक्यता आहे. राजस्थानला त्यांच्या विजयी संघाशी छेडछाड करणे अजिबात आवडणार नाही, पण वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईल दुखापतग्रस्त आहे. अशा परिस्थितीत संघात एक बदल होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईत अनमोलप्रीत सिंगच्या जागी सूर्यकुमारला संधी दिली जाऊ शकते. याशिवाय डॅनिअल सॅम्सलाही बाहेर बसावे लागू शकते, कारण मागील सामन्यात त्याने ४ षटकात ५७ धावा दिल्या होत्या. राजस्थानने गेल्या सामन्यात दोन्ही विभागात चमकदार कामगिरी केली होती. कर्णधार संजू सॅमसन, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल हे उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. ट्रेंट बोल्ट, यजुर्वेंद्र चहल, आर अश्विन हेही अप्रतिम कामगिरी करत आहेत. मात्र, राजस्थानला त्यांच्या क्षेत्ररक्षणातील त्रुटी सुधाराव्या लागतील, कारण एक चूकही त्यांना महागात पडू शकते. गेल्या सामन्यात राजस्थानचा संघ क्षेत्ररक्षणात थोडा कमकुवत दिसत होता.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन –
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स/फॅबियन लन, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बेसिल थम्पी.
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कप्तान), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, नॅथन कुल्टर-नाईल/जिमी नीशम, आर. अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, यजुर्वेंद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022: पंजाबच्या भानुका राजपक्षेने सांगितले निवृत्ती घेण्याचे कारण ; श्रीलंका बोर्डसंबंधी मोठे वक्तव्य
- “…त्यामुळे काहीजण सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारतात”, मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र
- IPL 2022: ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोलकात्याच्या खेळाडूंचा बोलबाला, आरसीबीचे हसरंगा आणि फाफ राहिले मागे!
- “आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल पण मेट्रो सुरु करा”- देवेंद्र फडणवीस
- “हे कमर्शियल आर्टिस्ट येतात अन्..” कुशल बद्रिकेने सांगितला सिद्धार्थ जाधवचा किस्सा
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

