🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. म्हणाले, “कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत. मग सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत असतात”.
हे काम सर्वांचं आहे. आमच्या मनात कुणाच्याही बाबत भेदभाव नाही, तसेच सरकारमध्ये कोणतेही रुसवे फुगवे नाहीत. सरकारचे नाव महाविकास आघाडी आहे. ही आघाडी जमिनीवर राहून राज्य विकासाचे नियोजनबद्ध काम करत आहे.
पुढे म्हणाले, आज आपण प्रत्यक्ष काम सुरु करत आहोत, हा महत्वाचा फरक आहे. हे काम बघितल्यावर आपल्यात कटुता निर्माण करणाऱ्यांना नक्की उत्तर मिळेल. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आपल्या कृतीतून आपण आज चोख उत्तर दिले आहे, असे डाळा येथील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. तेव्हा त्यांच्या या कामातून विरोधकांना चोख उत्तर दिल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
“आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल पण मेट्रो सुरु करा”- देवेंद्र फडणवीस
“हे कमर्शियल आर्टिस्ट येतात अन्..” कुशल बद्रिकेने सांगितला सिद्धार्थ जाधवचा किस्सा
‘त्या’ ट्वीट वर संजय राऊतांचे स्प्ष्टीकरण; म्हणाले,”मी त्या दिवसापुरतं बोलायचं नाही…”
“सरकारमध्ये रुसवे, फुगवे सुरू असल्याचे वातावरण…”, मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
IPL 2022 : रोहित, गेलपेक्षा उमेश यादव ठरला सरस..! ‘या’ विक्रमात दोघांनाही सोडलं मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
