मुंबई : वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या दमदार कामगिरीनंतर आंद्रे रसेलच्या झंझावाती खेळीमुळे कोलकाता नाइट रायडर्स संघाने आयपीएल २०२२च्या सामन्यात पंजाब किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला. उमेश यादवने २३ धावांत ४ बळी घेतले, तर रसेलने फटाकेबाज शैलीत ७१ धावांची नाबाद खेळी खेळली. उमेशला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. यासह, त्याने कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा सामनावीर बनण्याचा पराक्रमही केला. उमेशने या बाबतीत अनुभवी ख्रिस गेल आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मागे सोडले आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाबचा संघ १८.२ षटकात १३७ धावांवर सर्वबाद झाला. यानंतर कोलकाता नाइट रायडर्सने १४.३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ४ षटकात २३ धावांत ४ तर टिम साऊदीने २ बळी घेतले. त्यानंतर आंद्रे रसेलची बॅट तापली आणि त्याने ३१ चेंडूत २ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाने मोसमातील दुसरा विजय नोंदवला.
पंजाब किंग्जविरुद्ध सहाव्यांदा उमेशला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, ही लीगमधील कोणत्याही संघाविरुद्धची सर्वाधिक खेळी आहे. माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण डेक्कन चार्जर्सविरुद्ध पाच वेळा सामनावीर ठरला आहे, तर रोहित शर्मा आणि ख्रिस गेल यांना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पाचवेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- मिस युनिव्हर्स हरनाज संधू ‘या’ आजाराशी देतेय झुंज; स्वतः केला खुलासा
- IPL 2022: डबल हेडर धमाका ! मुंबईला आज राजस्थान भिडणार ; जाणून घ्या हेड टु हेड सामन्यात कोणाचे राहील वर्चस्व
- आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB पंच प्रभाकर साईलचा मृत्यू; मोहित कंबोज यांनी केली ‘ही’ मागणी
- “मेट्रोच्या कामाला भाजपने गती दिली आणि अंतीम टप्प्याकडे नेले” – भाजपकडून दावा
- गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


