🕒 1 min read
मुंबई: आयपीएलच्या ८व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला गेला आहे, ज्यामध्ये केकेआर पंजाब किंग्सपेक्षा सरस दिसली. या सामन्यापूर्वी कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जचा डाव केवळ १३७ धावांवर आटोपला. त्यामुळे पंजाबने दिलेले १३८ धावांचे लक्ष्य कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलच्या अर्धशतकाच्या जोरावर ६ गडी राखून पूर्ण केले.
KKRसाठी आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये, उमेश यादवने (Umesh yadav) आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या सामन्यात पहिली विकेट घेत उमेश यादवने आपला फॉर्म दाखवला. त्याने पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवालला (mayank agrawal) बाद केले. यानंतर उमेश यादवने या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टन, हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांच्या विकेट घेत आपले ४ बळी पूर्ण केले.आता उमेश यादव आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात केकेआरच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो आंद्रे रसेल andre russell) ठरला आहे. ज्याने कठीण परिस्थितीत येऊन स्फोटक फलंदाजी करत आपल्या संघासाठी विजयाचा उंबरठा ओलांडला. अवघ्या ५१ धावांच्या स्कोअरवर कर्णधारासह कोलकाताचे ४ फलंदाज बाद झाले. अशा स्थितीत आंद्रे रसेलने आक्रमक वृत्ती घेत मैदानात धावा काढण्यास सुरुवात केली. त्याने केवळ ३१ चेंडूत ८ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ७० धावा केल्या. त्यानंतर आता त्याला ऑरेंज कॅप मिळाली आहे. रसेलने आतापर्यंत ३ सामन्यात ९५ धावा केल्या आहेत.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “हे कमर्शियल आर्टिस्ट येतात अन्..” कुशल बद्रिकेने सांगितला सिद्धार्थ जाधवचा किस्सा
- ‘त्या’ ट्वीट वर संजय राऊतांचे स्प्ष्टीकरण; म्हणाले,”मी त्या दिवसापुरतं बोलायचं नाही…”
- “सरकारमध्ये रुसवे, फुगवे सुरू असल्याचे वातावरण…”, मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
- IPL 2022 : रोहित, गेलपेक्षा उमेश यादव ठरला सरस..! ‘या’ विक्रमात दोघांनाही सोडलं मागे
- IPL 2022: पंजाब विरुद्ध रसेलची बॅट तळपली; अन् एका शॉटवर अंपायर जखमी होता होता वाचला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
