Share

“जे आहेत मेट्रोचे मारेकरी ते बनले उद्घाटनकरी”, भातखळकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बहुप्रतिक्षीत मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे आज गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याच पाश्वर्भूमीवर शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणच देण्यात आले नाहीये. यावरून भाजपने मविआ सरकारवर टीका केली आहे. आता अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनीही ट्वीट करत मुख्यमंत्री ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.

“जे आहेत मेट्रोचे मारेकरी अहंकारी, विद्वेषी, वैरी ते बनले उद्घाटनकरी; मिरवतील दिवसभरी करतील फुकटची चमकोगिरी”, असा खोचक टोला भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे. तसेच कोतेपणालाही लाज वाटावी असे मुख्यमंत्र्यांचे वर्तन असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे. त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे. अजूनही काही मेट्रो स्थानकावरील कामे अपूर्ण आहेत. ही कामे आणि आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावणार आहे. मुंबई ‘मेट्रो 7’ च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये तर कमाल दर 80 रुपये असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022: डबल हेडर धमाका ! मुंबईला आज राजस्थान भिडणार ; जाणून घ्या हेड टु हेड सामन्यात कोणाचे राहील वर्चस्व

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB पंच प्रभाकर साईलचा मृत्यू; मोहित कंबोज यांनी केली ‘ही’ मागणी

“मेट्रोच्या कामाला भाजपने गती दिली आणि अंतीम टप्प्याकडे नेले” – भाजपकडून दावा

गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“गुढी उभारू आरोग्य सुविधांची, बळीराजाच्या सौख्याची…”, राष्ट्रवादीच्या अनोख्या शुभेच्छा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!