Share

“गुढी उभारू आरोग्य सुविधांची, बळीराजाच्या सौख्याची…”, राष्ट्रवादीच्या अनोख्या शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गुढी उभारू आरोग्य सुविधांची, गुढी उभारू बळीराजाच्या सौख्याची ,आर्थिक विकासाची, तरुणाईच्या क्षमतेची, गुढी उभारू महाराष्ट्राच्या प्रगतीची, दृढ संकल्पाची असा निर्धार करणाऱ्या चैतन्यमयी शुभेच्छा राष्ट्रवादीने ट्वीट करत दिल्या आहेत. गुढीपाडवा म्हणजे आनंद आणि सौख्याचा सण. परस्परांमधील स्नेह आणि नात्यातील गोडवा द्विगुणीत होवो, प्रगती आणि यशाचा आलेख उंचावत राहो अशा शुभेच्छा राज्यभरातून आज दिल्या जात आहेत.

तर ‘गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो. तसेच आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत’, असे म्हणत पंतप्रधान मोदींनीही गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तर दोन वर्षांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईनंतर उगवलेली कोरोनामुक्तीची पहाट आनंददायी, उत्साह वाढवणारी आहे. कोरोनाचं संकट संपण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री महोदयांनी कोरोनाबाबतचे निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली आहे. या काळात अवलंबलेली स्वच्छता,सुरक्षिततेची सवय वैयक्तिक,सार्वजनिक जीवनात यापुढेही कायम ठेवूया. निरोगी,बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान देऊया. असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

महत्वाचा बातम्या:

साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?; भातखळकरांनी व्यक्त केली शंका

साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?; भातखळकरांनी व्यक्त केली शंका

मोठी बातमी! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

“…जुमलेबाज़ मोदी सरकार”, महागाईच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंचे टीकास्त्र


“कोतेपणालाही लाज वाटावी असे मुख्यमंत्र्यांचे वर्तन…”, मेट्रो लोकार्पण निमंत्रणावरून भातखळकरांचा टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!