🕒 1 min read
मुंबई: डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात शनिवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स भिडतील. दोन्ही संघांना या सामन्याची सुरुवात जिंकण्याच्या इराद्याने करायची आहे. एकीकडे संजू सॅमसनचा संघ पहिल्या विजयाने उत्साहात आहे, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ अजूनही खाते उघडण्याच्या प्रतीक्षेत आहे. एमआय विरुद्ध आरआर यांच्या या मोसमातील हा दुसरा सामना आहे. फरक एवढाच की, पहिल्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली होती, तर मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण, शनिवारी होणाऱ्या या लढतीत काँटे की टक्कर होऊ शकते.
MI vs RR यांच्यातील सामना मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल. डीवाय पाटील स्टेडियमची खेळपट्टी बनवण्यासाठीही लाल मातीचा वापर करण्यात आला असून ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अतिशय अनुकूल आहे. कारण या पृष्ठभागावर वेगवान गोलंदाजांना चांगली उसळी मिळते ज्यामुळे फलंदाजांना खूप त्रास होतो. या सामन्यात हवामानही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. उन्हामुळे खेळाडूंची अवस्था बिकट होणार आहे. हवामानाबाबत बोलायचे झाले तर शनिवारी येथील तापमान ३२ ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. त्याच वेळी, वारा ताशी १८ किलोमीटर वेगाने पुढे जाईल. तर आर्द्रता ६१ टक्के राहील. म्हणजेच, सामन्यादरम्यान आर्द्रता खूप जास्त असेल आणि खेळाडूंना या कडक उन्हात सामना खेळावा लागणार आहे.
दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पण, दोन्ही संघांमधील हेड टू हेड सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत दोन्ही संघ २५ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी १३ वेळा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने बाजी मारली आहे. त्याचबरोबर राजस्थान संघाने ११ वेळा विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. हेड टू हेडनुसार मुंबईचे पारडे जड आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महताव्च्या बातम्या
- आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB पंच प्रभाकर साईलचा मृत्यू; मोहित कंबोज यांनी केली ‘ही’ मागणी
- “मेट्रोच्या कामाला भाजपने गती दिली आणि अंतीम टप्प्याकडे नेले” – भाजपकडून दावा
- गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- “गुढी उभारू आरोग्य सुविधांची, बळीराजाच्या सौख्याची…”, राष्ट्रवादीच्या अनोख्या शुभेच्छा
- आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन; फडणवीसांना निमंत्रण न दिल्याने लढाई..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
